
उबाठाचे माजी आमदार राजन साळवी यांची सुरक्षा काढल्याने आश्चर्य.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला उणेपुरे दोन महिने होत नाहीत तोच लांजा-राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. माजी आमदार राजन साळवी यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. माजी आमदार राजन साळवी यांची तत्काळ सुरक्षा काढून घेतल्याने उबाठाचे शिवसैनिक आणि पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त करीत शासनाला दोष दिला आहे.
सलग तीनवेळा राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदार संघाचे राजन साळवी यांनी नेतृत्व केले होते. मध्यंतरीच्या काळात राजन साळवी यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्यानंतर वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यानंतर सुद्धा आमदार असताना राजन साळवी यांच्याकडे सुरक्षा होती. मात्र आता विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर त्याचे निकाल लागले, यामध्ये साळवी यांना सुमारे आठ हजार मते मिळाली होती व सुमारे १९ हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
या निवडणुकीला दोन महिने होत असताना तत्काळ त्यांची सुरक्षा काढून घेतल्याचे समोर आले आहे. उबाठा शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने अनेक तोटे साळवी यांना भोगावे लागले असल्याचे याद्वारे स्पष्ट झाले आहे.www.konkantoday.com