माकडाने रिक्षाकडे धाव घेतल्याने चालकाचे नियंत्रणसुटून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू


सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणहुन खैदाच्या दिशेने जाणारी रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. माकडाने रिक्षाकडे धाव घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली.काल सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आडारी- खैदा रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक जयराम उर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अपघाताची गौरव कांबळी (रा. खैदा) यांनी मालवण पोलीस स्थानकात माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल(दि. ११) सकाळी साडे अकराच्या सुमारास जयराम मसुरकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एम. एच. ०७ ए.एच. १८६०) घेऊन मालवणहुन आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. या मार्गावरील बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एका माकडाने मसूरकर यांच्या रिक्षाच्या आतमध्ये उडी घेतली. यामुळे घाबरलेल्या मसूरकर यांचा रिक्षावरील ताबा सुटला. यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात मसुरकर यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यात गंभीर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button