स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला


रत्नागिरी पंचायत समिती माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. स्वप्नाली सावंत यांच्या खूनानंतर तिचा मोबाईल फोन पोलिसांना आढळला नव्हता. अखेर हा मोबाईल भाई सावंत यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.एका वर्षानंतर पोलीस तपासात हे मोठे यश लाभले असल्याचे बोलले जात आहे.
१ सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या किचनमध्ये गळा आवळून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. तसेच त्याची राख व हाडे समुद्रात फेकून दिल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी पती सुकांत उर्फ भाई सावंत (४७), रूपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (४३) व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग (रा. सर्व सडामिर्‍या, रत्नागिरी) यांच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button