महापुरूषांच्या शाळांना विकासाची अद्यापही प्रतीक्षा
देशातील महापुरूषांच्या मूळ गावांमधील शाळांचा विकास करण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरूड व पूज्य सानेगुरूजी यांचे मूळ गाव असलेल्या पालगड येथील जिल्हा परिषद शाळेचे रूपडे पालटणार आहे. मात्र या आदेशाला वर्ष उलटले तरी अद्यापही या शाळांना विकासाची प्रतिक्षा आहे.
याबाबत शिक्षण विभागाकडून आराखडा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवूनही वर्ष उलटले आहे. तरी शासनाकडून अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दापोली शिक्षण विभागाकडून मुरूड शाळेसाठी ३७ लाख ३५ हजार, तर पालगड शाळेसाठी ३३ लाख ८३ हजार रुपयांचा आराखडा पाठवण्यात आला आहे.
www.konkantoday.com