बारसूमध्ये आढळली आठ वर्षांनी एकदा फुलणारी कारवी फुल वनस्पती
पश्चिम घाट परिसरामध्ये आढळणारी आणि तब्बल आठ वर्षांनी फुलणारी कारवी ही फूलवनस्पती राजापूर तालुक्याच्या बारसू भागात आढळून आली आहे. राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या गोडे- दाते
क निष्ठ महाविद्यालयातील शिक्षक दत्तप्रसाद सिनकर यांनी या फुलवनस्पतीचा शोध लावला आहे. जांभळ्या टपोरी रंगाची फुले असलेली कारवी वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ असल्याची माहिती त्यांनी दिली.
बारसूच्या सड्यावर यापूर्वी एका दुर्मिळ कातळ शिल्पाचा शोध घेण्यात आला होता आता त्याच भागात दुर्मिळ फुल वनस्पती आढळल्याने. राजापूरकरांचे कुतुहल जागरूक झाले आहे. उन्हाळ्यामध्ये कोरडे शुष्क अन् रखरखीत असलेला हा कातळ परिसर पावसाळ्यामध्ये मात्र, बहरलेला असतो
www.konkantoday.com