गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता, कशेडी बोगद्याची एक मार्गिका आठ दिवसात सुरु होणार
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या एका लेनचे काम पूर्ण झाले असून गणेशोत्सवापूर्वी ही एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटाचे अंतर १० मिनटात पुर्ण करणे शक्य होणार आहे.
या बोगद्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते रत्नागिरीतील कशेडी हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी आता अवघड वळणांच्या कशेडी घाटातून जवळपास ३० मिनिटांचा कालावधी लागतो. तसेच अवजड वाहनांसाठी जवळपास ४० मिनिटांचा कालावधी लागतो. अवघड वळण घाटातून आहेत त्यामुळे अनेकदा अपघातांचेही प्रसंग ओढवतात पण या सगळ्याला आता उत्तम पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. शिवाय साडेसात किलो मीटर अंतर कमी होणार आहे.
महामार्ग ते बोगदा जोडणाऱ्या पुलांचे कामदेखील पूर्णत्वास गेले आहे. करोना कालावधीत हे काम रखडले होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना आता कशेडी घाटातील अवघड व धोकादायक वळणांचा प्रवास टळणार आहे. शिवाय वाहतूक कोंडी तून प्रवाशांची सुटका होणार आहे.
बोगद्याची मुंबईकडे जाणारी एक लेन गणेशोत्सव काळासाठी वाहतुकीकरिता खुली करण्यात येणार आहे. सध्या यावर अवजड किंवा मोठ्या वाहनांना प्रवेश नसेल. कार, जीप, रिक्षा आणि तत्सम हलक्या वाहनांना यातून प्रवास करता येईल. गणेशोत्सव संपल्यावर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास याच मार्गावरून होईल, त्यानंतर काही दिवसांसाठी हा बोगदा बंद ठेवण्यात येईल.
माहामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह बोगद्याच्या कामाची पाहणी केली.
www.konkantoday.com