
गणेशोत्सवात गैरप्रकार रोखण्यासाठी चिपळूण शहरातील महत्त्वाच्या भागांत १९२ सीसीटीव्ही
गणेशोत्सवात गैरप्रकार रोखण्यासाठी चिपळूण शहरातील महत्त्वाच्या भागांवर १९२ सीसीटीव्ही कॅमेराद्वारे पोलिसांची नजर असणार आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सूचना पोलिसांकडून केल्या आहेत. गणेश उत्सवात सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी नेहमी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन वृद्धांना लुबाडण्याचे प्रकार होतात.
चिपळूणमध्ये नोकरीधंद्याच्या निमित्ताने आलेले लोक गणेश उत्सवासाठी किमान आठवड्याची सुटी घेऊन अनेक जण आपल्या गावी जातात. या संधीचा फायदा घेऊन भुरटे चोर घरफोडी करतात. अलीकडे सीसीटीव्ही फुटेज गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज जागोजागी बसवण्यावर भर दिला आहे.
चिपळूण पालिका आणि पोलिस स्थानकामार्फत शहरातील १७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. खासगी लोकांमार्फत तब्बल १९७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेरा मधून शहरातील महत्त्वाच्या भागांवर लक्ष ठेवले जात आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक, शहराचे प्रवेशद्वार, बाजारपेठ आणि इतर सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे याचे कंट्रोल पोलिस आणि पालिका प्रशासनाकडे आहे.
www.konkantoday.com