आंबेत पुलाचे दुरुस्तीचे कामातील गर्डरचे सेंटरीग कोसळले ,आंबेत पुलाचे काम गणपतीपर्यंत होणे अशक्य


आंबेत पुलाचे काम अंतीम टप्यात आलेले असताना 31 ऑगस्ट 2023 रात्र आठ वाजण्याचे दरम्यान जुन्या कॉलमचा कठडा कोसळल्याने त्यांचे आधारावर उभे करण्यात आलेल्या नवीन स्लाबचे गर्डर करिता लावण्यात आलेले सेंटरीग कोसळून सावित्री नदीच्या पात्रात पडले.त्यामुळे गणेशोत्सवाची आधी पुलाचे काम पुर्ण होवून तो वाहतूकीसाठी खुला होण्याच्या सर्व शक्यता मावळल्याने मंडणगड तालुक्यातील नागरीकांची नाराजी विविध माध्यमातून व्यक्त होवू लागली आहे. गेल्या एक वर्षापासून आंबेत कडील बाजूने दुसऱ्या क्रमांकाचा पिलरचे दुरुस्तीचे काम सार्वजनीक बांधकाम विभाग माणगाव यांच्या माध्यमातून सुरु आहे.
या संदर्भात तालुक्यातील विविध संस्था, सामाजीक संघटना, व राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलन करीत पुल लवकारत लवकर सुरु कऱण्याची मागणी केल्यानंतर आवश्यक तो वेळ घेऊन बांधकाम विभागाने ऑगस्ट महिन्यात म्हाप्रळ आंबेत पुल गणेशोत्सवाचे आधी सुरु करण्याचे जाहीर केले होते. जुन्या पिलरला पिर्याय म्हणून बाजूने आठ नवीन पाईल उभे करण्यात आले होते. त्यावर पाईल कँप टाकल्यानंतर गर्डरचे काम सुरु असताना गर्डर साठी बांधण्यात आलेले सेटंरीग, काम सुरु असताना कोसळले. गुरुवारी सायकांळचे सुमारास अचानक घडलेल्या नवीन घटना क्रमामुळे नियोजीत वेळेत काम पुर्ण होणे जवळ जवळ अशक्य झाले आहे. जुन्या पिलरचे काही भागाचे कोसळण्याचे आवाजामुळे परिसरात एकच घबराट उडाली होती
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button