
तुळजापूर-रत्नागिरी एस.टी. बस उलटली, ७ जण किरकोळ जखमी
रत्नागिरी ः तुळजापूरहून रत्नागिरीकडे येणारी एस.टी. बस रस्ता सोडून खाली गेल्याने बस उलटून झालेल्या अपघातात वाहकासह ७ जण किरकोळ जखमी झाले. जखमींवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सोडण्यात आले. हा अपघात साखरपा नजिक मेढे गावाजवळ घडला. या अपघातात मीना शांताराम ठेेंगील, शांताराम ठेंगील, ऋतुजा ठेंगील (रा. रत्नागिरी), सुनिल पेंडसे (साखरपा), रमेश पितळे (चोरवणे), वाहक संग्राम हसके, चालक सागर मकसुद यांचा समावेश आहे.