“रत्नागिरी पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२3” चा पार पडला“सांगता समारंभ व बक्षीस वितरण सोहळा”.
पोलीस कवायत मैदान, रत्नागिरी येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय, “पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३” मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील पोलीस मुख्यालय तसेच खेड, चिपळूण, लांजा व रत्नागिरी उपविभागातील एकूण 30 पोलीस अधिकारी व 140 पोलीस अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
या स्पर्धेचा ‘सांगता समारंभ तसेच बक्षीस वितरण सोहळा’ दिनांक 29/08/2023 रोजी सायंकाळी, मा. श्री. व्ही. आर. जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रत्नागिरी, मा. श्री. चौत्रे मुख्य न्याय दंडाधिकारी, रत्नागिरी, मा. ए. एस. आंबाळकर अति. मुख्य सत्र न्यायाधीश रत्नागिरी, मा. श्री. एन. जी. गोसावी सचिव विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी, मा. श्री. अनिरुद्ध फणसेकर सरकारी वकील रत्नागिरी यांच्या शुभहस्ते तसेच मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना व संघांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके, पदके व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या दरम्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी मर्या. व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील 45 गुणवंत पोलीस पाल्यांचा देखील गौरव करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या स्पर्धकांची व संघांची नावे खालील प्रमाणे आहेत.
अक्र स्पर्धेचा प्रकार (वैयक्तिक) पुरुष स्पर्धकाचे नाव नेमणूक
1) 100 मिटर धावणे पोशि/४९४ दिनकर उघडा पोलीस मुख्यालय
2) २०० मिटर धावणे पोशि/७९५ शिवराम सागडे पोलीस मुख्यालय
3) ४०० मिटर धावणे पोशि/४४८ प्रल्हाद खोकले पोलीस मुख्यालय
4) ८०० मिटर धावणे पोशि/९१४ ओंकार पाटील पोलीस मुख्यालय
5) १५०० मिटर धावणे पोशि/४४८ प्रल्हाद खोकले पोलीस मुख्यालय
6) 5 किमी धावणे पोशि/९१४ ओंकार पाटील पोलीस मुख्यालय
7) १० किमी धावणे पोशि/९१४ ओंकार पाटील पोलीस मुख्यालय
8) गोळा फेक पोना/११ नितीन डोळस पोलीस मुख्यालय
9) थाळी फेक पोहवा/११५१ वृक्षाल शेटकर चिपळूण पोलीस ठाणे
10) भाला फेक पोशि/१२९ गिरीजाआप्पा लोखंडे पोलीस मुख्यालय
11) लांब उडी पोशि/४९४ दिनकर उघडा पोलीस मुख्यालय
12) 1004 रीले धावणे पोशि/७९५ शिवराम सागडे पोशि/४४८ प्रल्हाद खोकले पोशि/५६३ नारायण कावाले पोशि/९१४ ओंकार पाटील सर्व पोलीस मुख्यालय 13) ४००४ रीले धावणे पोशि/७९५ शिवराम सागडे
पोशि/४४८ प्रल्हाद खोकले
पोना/११ नितीन डोळस
पोशि/९१४ ओंकार पाटील सर्व पोलीस मुख्यालय
अक्र स्पर्धेचा प्रकार (वैयक्तिक) महिला स्पर्धकाचे नाव नेमणूक
1) 100 मिटर धावणे मपोशि/१४६२ अमृता वडाम पोलीस मुख्यालय
2) २०० मिटर धावणे मपोशि/१३५८ शीतल पिंजरे पोलीस मुख्यालय
3) ४०० मिटर धावणे मपोशि/१३५८ शीतल पिंजरे पोलीस मुख्यालय
4) ८०० मिटर धावणे मपोशि/१३५८ शीतल पिंजरे पोलीस मुख्यालय
5) १५०० मिटर धावणे मपोशि/१३५८ शीतल पिंजरे पोलीस मुख्यालय
6) 5 किमी धावणे मपोशि/३३६ दर्शना शिंदे पोलीस मुख्यालय
7) गोळा फेक मपोशि/६५८ कोमल ढोले पोलीस मुख्यालय
8) थाळी फेक मपोशि/५५८ तेजस्विनी जाधव खेड पोलीस ठाणे
9) भाला फेक मपोशि/३९० धनश्री घाडी पोलीस मुख्यालय
10) लांब उडी मपोशि/१३५८ शीतल पिंजरे पोलीस मुख्यालय
11) 100*4 रीले धावणे मपोशि/१३५८ शीतल पिंजरे
मपोशि/१४६२ अमृता वडाम
मपोशि/३३६ दर्शना शिंदे
मपोशि/७४९ पूजा पाटील सर्व पोलीस मुख्यालय
अक्र स्पर्धेचा प्रकार (सांघिक) पुरुष संघ क्रमांक
1) फुटबॉल पोलीस मुख्यालय रत्नागिरी प्रथम
2) हॉकी पोलीस मुख्यालय रत्नागिरी प्रथम
3) हॅंड बॉल पोलीस मुख्यालय रत्नागिरी प्रथम
4) बास्केट बॉल खेड उपविभाग प्रथम
5) व्हॉलीबॉल चिपळूण उपविभाग प्रथम
6) कबड्डी पोलीस मुख्यालय रत्नागिरी प्रथम
अक्र स्पर्धेचा प्रकार (सांघिक) महिला संघ क्रमांक
1) बास्केट बॉल रत्नागिरी उपविभाग प्रथम
2) व्हॉलीबॉल लांजा उपविभाग प्रथम
या स्पर्धेमध्ये “उत्कृष्ट खेळाडू (पुरुष)” पोशि/४९४ दिनकर नामदेव उघडा नेमणूक पोलीस मुख्यालय व “उत्कृष्ट खेळाडू (महिला)” मापोशि/१४६२ अमृता श्रीकांत वडाम नेमणूक पोलीस मुख्यालय ठरले आहेत तसेच या स्पर्धेची “जनरल चॅम्पियनशिप” ही पोलीस मुख्यालय, रत्नागिरी च्या संघाने प्राप्त करण्याच्या बहुमान मिळविला आहे.
www.konkantoday.com