मनसे कार्यकर्त्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यात खळखट्याक सुरूच
मुंबई गोवा महामार्ग रखडल्याच्या मुद्द्यावर रत्नागिरी जिल्ह्यात कोकण जागर यात्रा सुरू झाली.मनसेच्या या जागर यात्रेत राज ठाकरे यांचं भाषणही झालं. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर सर्वात पहिली प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उमटलेली पाहायला मिळाली.मुंबई गोवा महामार्गावर बोरज या ठिकाणी महामार्ग ठेकेदाराच्या कार्यालयाशेजारी, तसंच टोलनाक्याच्या शेजारी उभे असलेल्या डंपरवर मनसे कार्यकर्त्याने हल्ला केला. ठेकेदाराच्या डंपरच्या काचा मनसे कार्यकर्त्याने फोडल्या.रायगड जिल्ह्यातल्या कोलाड येथे राज ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर लगेचच पहिली आक्रमक प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उमटलेली आहे. या आधी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंचं महामार्गासंदर्भात भाषण झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया रायगड जिल्ह्यात माणगाव या परिसरात उमटली होती, यावेळी खेडमध्ये मनसे कार्यकर्त्याने कंत्राटदाराचा डंपर फोडला.मुंबई गोवा महामार्गावर खेड आणि चिपळूणच्या दरम्यान तसेच लोटे एमआयडीसीच्या नजीक असणाऱ्या बोरज येथील टोलनाक्याचे शेजारी महामार्ग बांधकाम ठेकेदाराचे कार्यालय आहे, याच ठिकाणी ठेकेदाराचे डंपर तसेच इतर वस्तू देखील आहेत. राज ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर मनसे कार्यकर्त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली. राज साहेब तुम आगे बढो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत ठेकेदाराच्या डंपर च्या काचा मनसे कार्यकर्त्याने फोडल्या आहेत.
www.konkantoday.com
पहा व्हिडिओ….