परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या चिरणी आमडस मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी प्रवाशांचे हाल
परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या चिरणीआमडस मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत
चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीस बंद केल्यानंतर लोटे-चिरणी, आंबडस या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येत आहे. मात्र या मार्गावर गुरूवारी दुपारी एक डंपर बंद पडल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. या मार्गावर हलकी वाहने सोडायची असतानाच अवजड वाहनेही सोडली जात असल्याने वाहतूककोंडीला वारंवार समोर जावे लागत असून त्यामध्ये वाहनचालक व हाल सुरू आहेत. परशुराम
घाट बंद करताच पर्यायी लोटेचिरणी, आंबडस मार्गावर गेल्या ३ दिवसांपासून
प्रचंड वाहतूककोंडीला सामना करावा आहे. एकेरी मार्ग व रस्त्याचे कामही अर्धवट स्थितीत असतानाच अवजड वाहने सोडल्याने वाहतूककोंडीत भर उन्हात ताटकळत रहावे लागत आहे. गुरुवारी दुपारी १२ वा. घाटातील वाहतूक बंद केली गेल्यानंतर चिरणी मार्गावर वाहनांची गर्दी वाढली. अशातच चिरणी बायपास खरवली येथे लोटेकडे जाणारा डंपर बंद पडला. तो पुढे व मागेही जात नसल्याने वाहने अडकून पडली. त्यातच एक बस उतारावरून वळणावर अगदी समोर थांबल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली. काही पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.
आता सुट्या पडल्यामुळे अनेक सहकारमाने कोकणात येण्यासाठी खाजगी गाड्या चा वापर करीत आहे त्यामुळे या पर्यायी मार्गावरील वाहनांची कोंडी होण्याच्या प्रकारात यापुढेही वाढ होणार आहे
www.konkantoday.com