
फणसट येथे सप्तलिंगी नदीपात्रात सापडला वृद्धाचा मृतदेह
संगमेश्वर तालुक्यातील फणसट येथे सप्तलिंगी नदीपात्रात फणसट बौद्धवाडी येथीलच ७९ वर्षीय वृद्धाचा मृतदेह मिळून आल्याची घटना घडली आहे.
देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सागवे गावचे पोलीस पाटील शेलार यांनी फिर्याद दिली. केशव भिलाजी जाधव असे वृद्धाचे नाव आहे. फणसट येथे सप्तलिंगी नदी पर्याचे कोंड येथे एक मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसला. यानुसार घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर मुरूडकर, होमगार्ड पावसकर यांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. जाधव यांचा मृतदेह कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर हा मृतदेह केशव जाधव यांचा असल्याचे स्पष्ट झाले. www.konkantoday.com