कोकणात थंडी वाढली; दापोलीचा पारा 10 अंशावर
रत्नागिरी : मुंंबईसह कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारठ्यात वाढ झाली असून, आगामी 24 तासात तापमान आणखी दोन ते तीन अंशाने खाली येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दापोलीत दि. 11 रोजी 10 अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासांत थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, सांताक्रुझ, कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, डहाणू या भागातही थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी सकाळी रत्नागिरीत 25 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी रात्री किमान तापमानात पाच ते 4 अंशाची घट झाली होती. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचेच असणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे.