रत्नागिरीतील नर्मदा सिमेंट युनिटमधून वायर चोरणार्यांना पोलिस कोठडी
रत्नागिरी : भगवती बंदर येथील नर्मदा सिमेंट युनिटमधून 40 हजार रुपयांची तांब्याची वायर चोरून नेणार्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 ते 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. कालावधीत घडली आहे. या दोघांनाही शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ऋतेज मंगेश धुळप (वय 26, रा. घुडेवठार, रत्नागिरी ), विजय विनय कवडे (29, रा. रत्नागिरी ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात मॅनेजर संतोष शिवाजी मोरे (50, रा. गाडीतळ, रत्नागिरी ) यांनी 14 डिसेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.