
रत्नागिरी शहरातील चर्मालय परिसरातून महिला बेपत्ता
रत्नागिरी शहरातील चर्मालय परिसरातून आयशा अरफाद पाटणकर ( २९, रा. चर्मालय, रत्नागिरी) ही बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. आयशा ही १५ नोव्हेंबर २०२३ पासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांकडून देण्यात आली.
आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा पाटणकर ही १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास राहत्या घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. या बाबत तिच्या नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे संपर्क करण्यात आला, मात्र तिची कोणतीही माहिती मिळू शकली नाही, अशी तक्रार नातेवाईकांनी शहर पोलिसांत दिली. दरम्यान या महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
www.konkantoday.com