म्हाप्रळ – आंबेत पुलाच्या दुरुस्तीकरिता वर्क ऑर्डरचे आश्वासन
मंडणगड : म्हाप्रळ – आंबेत पुलाच्या दुरुस्तीकरिता मंडणगड शहर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्यापांसुन सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. कामाची वर्क ऑर्डर मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
व्यापारी संघटनेने 11 डिसेंबर 2022 रोजी म्हाप्रळ आंबेत पुलावरुन उड्या टाकून जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. याचबरोबर त्या दिवशी मंडणगड शहरात व्यापार्यांचा कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा प्रशासकीय यंत्रणाना दिला होता. या संदर्भात 8 डिसेंबर 2022 पर्यत यंत्रणा व व्यापारी यांच्यामध्ये झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या होत्या. कामाची वर्क ऑर्डर निघाली नाही तर कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करण्याच्या मागणीवर व्यापारी संघटना ठाम होती.
दि.11 डिसेंबर रोजी दुपारी तहसीलदार विजय सुर्यवंशी यांनी व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष प्रमोद काटकर यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी नीलेश गोवळे, श्रीपाद कोकाटे, विनोद जाधव, कौस्तुभ जोशी, राजेश पारेख, वैभव कोकाटे, प्रवीण जाधव उपस्थित होते.