कासारवेली येथील तरुणाची कर्जाच्या आमिषाने 9 लाख 26 हजारांची फसवणूक
रत्नागिरी : कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून 9 लाख 26 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेत फसवणूक केली. ही घटना 22 मार्च ते सप्टेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी सोलापूर येथील राजेश नडीमेटला विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात साई आनंद प्रसादे (34, मूळ रा.कासारवेली, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, राजेशने साईला फोन करून पुण्यातील ऍक्सीस बँकेतून 8 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने साईकडून वेळोवेळी पैशांची मागणी करून कर्जापेक्षाही जास्त असे 9 लाख 26 हजार रुपये ऑनलाईन मागून घेत फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.