
चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात कोकणातील साहित्यिकांच्या तैलचित्राचे दालन उभे राहणार
चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या वस्तूसंग्रहालय आणि कलादालन या दोनही भव्यदिव्य प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यामध्ये गौरवपूर्ण नामोल्लेख असलेल्या कोकणातील मान्यताप्राप्त पन्नासहून अधिक साहित्यिकांची तैलचित्रे असलेले कलादालन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचनालयाचे यापूर्वीचे दोनही प्रकल्प आवर्जून भेट देऊन पाहावेत. पुढील पिढीला समजून सांगावेत इतके महत्वाचे असून साहित्यिकांचे कलादालनही त्याच धर्तीवर उभारले जाणार आहे,
www.konkantoday.com