पाचवली येथे गोठ्याला आग लागून नुकसान
दापोली तालुक्यातील पाचवली येथे एका गोठ्याला आग लागून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना नुकतीच घडली असून दापोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार श्रीराम म्हस्के (वय 59, रा. पाचवली) यांच्या गुरांचा गोठा आहे. 22 रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या गुराच्या गोठ्याला आग लागून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार चव्हाण हे करीत आहेत.