शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

रत्नागिरी : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून शिक्षक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 21 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली असून तब्बल 45 दिवस ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दि. 25 डिसेंबर रोजी बदली पात्र शिक्षकांच्या हाती बदलीचे आदेश सोपवले जाणार आहेत. नुकतेच शासनाकडून जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. वेळापत्रकानुसार सर्वप्रथम जिल्ह्यातील अवघड क्षेत्रांची निश्चिती केली जाणार आहे. त्यासाठी दि. 21 व 22 असा दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. ही जबाबदारी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्‍यांची असणार आहे. सुमारे दिड ते पावणेदोन महिने ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. दि.25 रोजी बदलीपात्र शिक्षकांच्या हातात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्यामार्फत बदली आदेश देण्यात येणार आहेत. मंगळवार दि. 25 ऑक्टोबर अखेर बदलीपात्र शिक्षकांची अद्ययावत यादी तयार करण्यात येणार आहे. दि.26 व 28 या काळात संवर्ग1वरचे फॉर्म भरुन घेण्यात येणार आहेत. तर 29 रोजी बदली पात्र आणि बदली अधिकारपात्र याद्या पुन्हा जाहीर करण्यात येणार आहेत.  दि.30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत याद्यांच्या अनुषंगाने काही आक्षेप असतील तर शिक्षणाधिकार्‍यांकडे अपील करता येणार आहे. दि. 2 ते 5 दरम्यान दाखल अपील स्वीकारणे अथवा नाकारण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दि.6 ते 7 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करता येईल. दि.11 रोजी पुन्हा विशेष संवर्ग 1व 2 च्या याद्या जाहीर करण्यात येतील. दि. 12 रोजी रिक्त जागांची यादी जाहीर होईल. दि. 13 व 15 या काळात शिक्षकांना संवर्ग 1साठी प्राधान्यक्रम भरता येणार आहे.
दि. 16 व 18 रोजी विशेष संवर्ग 1 साठी बदली प्रक्रिया चालवण्यात येईल. दि. 19 रोजी रिक्त जागांची यादी प्रकाशित करण्यात येईल. दि.20 ते 22 दरम्यान बदली प्रक्रिया चालवण्यात येईल. दि. 11 व 13 डिसेंबरदरम्यान विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरता येतील. दि. 14 ते 16 या कालावधीत विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया राबवण्यात येईल.
दि. 17 रोजी रिक्त पदांची यादी जाहीर होईल. दि. 18 रोजी बदलीपात्र शिक्षकांची (10 वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले शिक्षक) यादी प्रसिध्द केली जाईल. दि. 19 ते 21 दरम्यान अवघड क्षेत्रात रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी राऊंड होणार आहे. तसेच दि. 22 ते 24 रोजी बदली प्रक्रिया चालवली जाणार असून दि.25 रोजी प्रत्यक्ष बदली आदेश प्रकाशित होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button