एसटी बसेसची गुणवत्ता तपासण्याची सक्ती

रत्नागिरी : राज्याच्या काही भागात एसटी बसच्या अपघाताने बर्‍याच प्रवाशांनी जीव गमावला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे बघत आता महामंडळाने यंत्र अभियंता ते सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकांपर्यंत सगळ्यांना दैनंदिन निश्चित संख्येने बसेसची गुणवत्ता तपासण्याची सक्ती केली आहे. या तपासणीचे निरीक्षण संबंधितांना देण्याचे राज्यातील सगळ्या विभाग नियंत्रकांना मिळालेल्या आदेशात नमूद आहे.
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी वाहनांची गुणवत्तापूर्वक देखभाल-दुरुस्तीनंतरच बसेस मार्गावर काढण्याबाबत सूचना दिल्या जातात. त्यानंतरही राज्यातील बर्‍याच भागात एसटी बसचे अपघात होतात. त्यामुळे प्रवशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आता महामंडळाने बसेसच्या गुणवत्तापूर्ण तपासणीचे जुने आदेश रद्द करत नवीन आदेशानुसार कारवाईचे आदेश काढले. त्यानुसार यंत्र अभियंत्याला आगार भेटीच्या वेळेला तेथील किमान 5 वाहनांची आणि इतर दिवशी विभागीय कार्यशाळेतील 2 बसेसची गुणवत्ता तपासणी करायची आहे.
उप यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारात त्या आगाराशी संबंधित किमान 5 वाहनांची तपासणी करायची आहे. किंवा इतर आगाराच्या किमान 5 वाहनांची तपासणी करायची आहे. सहाय्यक यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारातील त्याच्याशी संबंधित 5 बसेसची तपासणी करायची आहे.किवा मुख्यालयाच्या आगाराशिवाय विभागातील इतर आगाराच्या 5 बसेसची तपासणी करायची आहे. आगार व्यवस्थापकांना दररोज त्यांच्या आगारातील 5 बसेसची गणवत्ता तपासणी करायची आहे. तर आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षकांनाही त्या आगारातील 5 बसेसची दैनंदिन तपासणी करायची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button