
पोषण आहारापासून तालुक्यातील अनेक शाळा वंचित
फेब्रुवारी महिन्यात आदेश निघूनही रत्नागिरी तालुक्यातील अनेक शाळा पोषण आहारापासून वंचित आहेत या विषयावरून पंचायत समितीची सभा गाजली पोषण आहार अधीक्षक योग्य काम करीत नसल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला पोषण आहार योजनेचा पुरवठादार बदलल्याने हा विलंब झाल्याचे अधीक्षकांनी सांगितले शेवटी या प्रश्नांबाबत गजानन पाटील व भैय्या भोंगले यांनी आवाज उठवला या प्रकाराला कारणीभूत असलेल्या पुरवठादारावर दंडात्मक कारवाई करू असे आश्वासन आहार अधीक्षकांनी दिले.