संगमेश्‍वर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

संगमेश्वर : तालुक्यातील असुर्डे, आंबेड बुद्रुक आणि कोंडअसुर्डे या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. याचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून आंबेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी सुहास मायंगडे, असुर्डेच्या प्रदीप शिंदे आणि कोंड असुर्डेच्या सरपंचपदी सिद्धीकी  बोले हे विजयी झाले आहेत.
देवरूख तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात ही मतमोजणी तहसीलदार सुहास थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
यात आंबेड बु. ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी सुहास मायंगडे 766 मते घेऊन विजयी झाले आहेत तर त्यांच्या समोर असलेल्या रघुनंदन भडेकर यांना 335, शोएब भाटकर 68 मते,  अनिरुद्ध मोहिते यांना 175 मते मिळाली आहेत. सदस्य पदासाठी सुरेश किंजले 304 मते, पूजा मोहिते 316, शोएब भाटकर 252 मते आणि राजेश आंबेकर याना 222 मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत. संचिता पाचलके, ममता कानर, काशिनाथ कानर, साक्षी शिगवण, नुपुरा मुळ्ये हे बिनविरोध निवडून आले आहेत.
कोंड असुर्डे ग्रामपंचायतीची अतिशय अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत गाव विकास पॅनेल उभे करण्यात आले होते. थेट सरपंच पदासाठी सिध्दीका बोले विरुध्द सोनाली शिंदे यांच्यात दुरंगी लढत झाली. मात्र या लढतीत सोनाली चंद्रकांत शिंदे यांचा 6-मतांनी पराभव करुन सिध्दीका बोले यांनी निसटता विजय प्राप्त केला आहे. सिध्दीका बोले यांना एकूण 270 मते मिळाली तर सोनाली चंद्रकांत शिंदे यांना 264 मते मिळाली. श्रुती कापडी, अंकिता शिंदे, श्रीधर राजपूत, भारतराज  गमरे, दिप्ती पानगले, कृष्णा डावल, पूजा करदोडे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
असुर्डे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत प्रदीप शंकर शिंदे हे 535 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्यासमोर दीक्षा खानविलकर यांना 18 तर राकेश जाधव यांना 190 मते मिळाली. सदस्य पदाच्या निवडणुकीत अशोक तांबे 202 मते मिळवून विजयी झाले आहेत.
यशवंत मनवे यांना 91 मते मिळाल्याने ते पराभूत झाले आहेत. दीक्षा खानविलकर, सरिता खानविलकर, संकेत गुरव, विजया पाताडे, समिता मनवे, अनिल मुंडेकर, ज्योती शीतप, विजय पालांडे हे बिनविरोध निवडून आले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार सुहास थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button