माजी आमदार तु. बा. कदम यांच्या पत्नी विजया कदम यांचे निधन
खेड : माजी आमदार तु. बा. कदम यांच्या पत्नी विजया तुकाराम कदम यांचे शुक्रवारी दि.१४ ऑक्टबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने मुंबई येथे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि चार मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा खेड अध्यक्ष अमित कदम यांच्या त्या मातोश्री होत. श्रीमती कदम यांच्या पार्थिवावर शनिवारी दि १५ रोजी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत खेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.