चिपळुणातील कबड्डीपटू अजिंक्य पवार व शेखर तटकरे यांची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड
चिपळूण : चिपळुणातील कबड्डीपटू अजिंक्य पवार व शेखर तटकरे या दोघांची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष मंगेश तथा बाबू तांबे व अन्य सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या दोघांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. हे दोन्ही खेळाडू चिपळूणचे असल्याने तालुका कबड्डी असो.ने त्यांचा गौरव केला. यावेळी संघटनेचे कार्यवाह विलास गुजर, कार्याध्यक्ष एल. के. शिंदे, उपाध्यक्ष संतोष शिंदे, खजिनदार ऋषिकेश झगडे, सहचिटणीस नितीन कदम, सदस्य पूजा तांबट, विलास जाधव, मंगेश पवार, मिलिंद विखारे, जगदीश शिंदे, संतोष शिर्के आदींनी अभिनंदन केले आहे.