पुरूषोत्तम करंडकमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची ‘कुपान’ द्वितीय

रत्नागिरी : 27 व 28 सप्टेंबर रोजी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात पुरूषोत्तम करंडक रत्नागिरी विभागाची फेरी अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत झाली. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘कुपान’ एकांकिकेने द्वितीय क्रमांकाच्या करंडकाचा मान पटकावला.
सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा शुभम गोविलकर तसेच सर्वोत्कृष्ट अभिनय गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची आर्या वंडकर हिने मिळवला. संघाचे मार्गदर्शक म्हणून गणेश राऊत यांनी मदत केली, तसेच गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांचे  मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 10 महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. सादर झालेल्या एकांकिकांमधून 4 एकांकिकेचे संघ पुण्यात होणार्‍या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यात अनुक्रमे डीबीजे महाविद्यालय चिपळूण, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, फिनोलेक्स महाविद्यालय, आणि स.ह. केळकर महाविद्यालय देवगड यांचा समावेश आहे.
या फेरीचे परीक्षण विनयराज उपरकर, प्रदीप तेंडुलकर आणि गिरिश केमकर यांनी केले. हा कार्यक्रम रत्नागिरी आकाशवाणीचे प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी महाराष्ट्रीय कलोपासकचे विश्वस्त प्रदीप पाटसकर, चिटणीस ठाकूरदेसाई तसेच, डॉ. संजय केतकर, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर आदी उपस्थित
होते.
याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले
आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button