खेडमधील विद्यार्थ्याची लंडन येथे उच्च शिक्षणासाठी निवड
खेड : तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयाचा विद्यार्थी अयान बेबल याची लंडन येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. संगणक विभागामध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अयानची ‘वेस्टलंडन विद्यापीठ’ येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाकडून त्याला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले तसेच प्रवेशासाठी लागणार्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महाविद्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आल्याने या यशामध्ये ज्ञानदीप महाविद्यालयाचा वाटा मोठा असल्याची प्रतिक्रिया अयान बेबल याने येथे बोलताना व्यक्त
केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानदीप सदैव प्रयत्नशील राहील, असे मनोगत प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी व्यक्त केले.