
मा.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी कोव्हीड-१९ योद्ध्यांचा सन्मान
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांना कोविड – १९ म्हणून सन्मानित करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात जाऊन भाजपा नेते, कार्यकर्ते यांनी आवर्जून भेट घेतली व त्यांचा सन्मान केला. राजू भाटलेकर यांच्या पुढाकारातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात औचित्यपूर्ण सन्मान करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयाचे सर्व कोविड योद्ध्यांचे काम हे देव दुतासारख आहे. मंदिरातले सर्व देव यांच्या रूपात हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत असे उद्गार याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी काढत कोविड योद्ध्यांना गौरविले. असणारी साधन, मनुष्यबळ यांना बरोबर घेऊन जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा संघ भावनेतून सेवा कार्यात मग्न आहे. धोका पत्करून संपूर्ण सेवा भावनेतून चाललेल्या या कामापुढे नतमस्तक आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करता सेवाकार्य करा असा संदेश दिला. स्वतः सातत्याने सर्वदूर संपर्क करत, फिरून समस्या जाणून घेणे व समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून यशस्वी प्रयत्न करणे या आपल्या कृतीने मा.देवेंद्रजीनी एक वेगळे उदाहरण घालून दिले. त्याच भावनेतून आजचा सेवा दिवस म्हणून रत्नगिरी भाजपाने आयोजित केला. राजू भाटलेकर यांनी अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून औचित्य साधले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी प्रमुख डॉ. फुले, डॉ.सौ.धुरी, डॉ. कांबळे, डॉ.गावडे, डॉ.शेरखाने, डॉ.विटेकर, डॉ.निम्मलवार, श्रीमती ढोले यांचा सन्मान प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन अॅड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी सचिन वहाळकर, राजू भाटलेकर, अण्णा करमरकर, बाबू सुर्वे, मुन्ना चवंडे, राजन पटवर्धन, राजन फाळके आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com
