दारूच्या नशेत रत्नागिरी शहर पोलिस ठाणे परिसरात आरडाओरडा

रत्नागिरी : दारूच्या नशेत शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आरडाओरडा करत वादविवाद केला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 13 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वा. घडली. सर्फराज अलिमियाँ होडेकर, मुक्तदीर कादर जागीरदार (दोन्ही, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस नाईक मंदार मोहिते यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी रात्री या दोघांनी दारूच्या नशेत धुंद होऊन शहर पोलिस ठाण्याच्या आवारात आरडाओरडा करत वादविवाद केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार वीर करत
आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button