
कशेडीत चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडली
खेड : तालुक्यातील कशेडी गावात श्री सुकाई कोटेश्वरी देवीच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील सात हजार रुपयांची रोकड लांबवली आहे. ही घटना दि. 12 रोजी सायंकाळी 5 ते दि. 13 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या वेळेत घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दि.13 रोजी सकाळी 7 रोजी कशेडी गावातील मंदिराचे कडी, कोयंडा, कुलूप तुटलेले काही ग्रामस्थांना दिसले. याबाबत विनायक लक्ष्मण दरेकर (वय 49, रा. कशेडी बावेवाडी) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामध्ये नमूद केल्यानुसार अज्ञात इसमाने कोणत्यातरी धारदार हत्याराने मंदिराचे कुलूप काढून मंदिरात प्रवेश
केला. गाभार्यातील चांदीची दानपेटी मंदिराशेजारी असलेल्या शेतात नेऊन ती फोडून त्यातील सात हजार रुपये त्याने चोरून नेले. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.