
अल्पवयीन युवतीवर अत्याचार; आरोपीला अटक
खेड : दुकानावर वस्तू आणण्यसाठी गेलेल्या अल्पवयीन युवतीला एकटी गाठून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २८ वर्षीय युवकाला खेड पोलिसांनी गजाआड केले आहे. विजय बर्गे असे या संशयिताचे नाव असून ही घटना खोपी येथे घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
खेड तालुक्यातील खोपी गावातील एक १६ वर्षीय युवती किराणा दुकानावर वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. या युवतीच्या पाळतीवर असलेल्या विजय याने तिला वाटेत गाठून जबरदस्तीने जवळच्या माळरानावर नेली आणि तिच्यावर लैगिक अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता केलीस तर तुला तुझ्या नातेवाईकांसह जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली.
पीडित युवतीने याबाबत घरी सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी तात्काळ खेड पोलिसात तक्रार दाखल केली. खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तात्काळ संशयित आरोपी विजय बर्गे याला ताब्यात घेतले.
बर्गे याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. विजय याला न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोनि सुवर्णा पत्की याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वैशाली अडकून आणि पी एस म्हस्के करीत आहेत.
www.konkantoday.com