
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांनी भरले अवयव दानाचेअर्ज
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी च्या वतीने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या नेतृत्वामध्ये हे कार्यक्रम राबविले जात असून आज सकाळी 11 वाजता शासकीय रुग्णालयात एकत्र येत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अवयव दानचे फॉर्म भरले. व समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. यावेळी विक्रम जैन, अशोक वाडेकर, दादा ढेकणे, अनिरुद्ध फळणीकर , पल्लवी पाटील, धनंजय पाथरे, प्रशांत पाटकर, सतेज नलावडे, आदी भाजपा कार्यकर्ते यांनी फॉर्म भरला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन केले.
www.konkantoday.com