
हातखंबा-बावनदी मार्गावर धुळीचे साम्राज्य
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ते बावनदी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतील माती रस्त्यावर आली असून मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या धुळीमुळे दुचाकीस्वारांना जास्त त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे दणकेही बसत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही या मार्गावर होत आहेत. खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.