क्रेडीट कार्डला झालेला फाईन रिफंड करुन देतो असे सांगून रत्नागिरीतील इसमाची ४१ हजार रुपयांची फसवणूक
रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी, आदर्शवसाहतीत राहणारे राजू सुभाष पवार यांना तुमचे क्रेडीट कार्डला झालेला फाईन रिफंड करून देतो असे सांगून त्यांच्याकडुन कोड घेवून त्यांच्या खात्यातील ४०,९४० रुपये काढून घेवून फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. त्याबाबत प्रियंका शर्मा या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजू पवार हे आपल्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यामध्ये मी ऍक्सिस बँक पुणे येथून प्रियांका शर्मा बोलत असल्याचे सांगून तुमच्या ऍक्सिस बँकेतील क्रेडीट कार्ड उशीराने ऍक्टीव्ह केल्याने तुम्हाला ५९० रुपयांचा लागलेला फाईन रिफंड होणार असून फिर्यादीचा विश्वास संपादन केला त्यानंतर फिर्यादीकडून बँक खात्याचा कोड विचारून फिर्यादीचे खात्यातून ४०,९४० रुपये काढून घेवून फसवणूक केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. www.konkantoday.com