कारवांची वाडी येथील तरुणाची 41 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी : कारवांचीवाडी येथील तरुणाची सुमारे 41 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. घडली. प्रियांका शर्मा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात राजू सुभाष पवार (वय 42, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पुणे येथील अॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुमचे क्रेडिट कार्ड उशिराने अॅक्टिव्ह केल्याने 590 रुपयांचा लागलेला दंड तुम्हाला परत मिळणार असल्याचे सांगून मोबाईलवर आलेल्या मेसेजमधील कोड विचारून घेतला. पवार यांनी तो कोड सांगितल्यावर त्यांच्या बँक खात्यातून 40 हजार 940 रुपये काढण्यात आल्याचा त्यांना मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राजू पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सूर्य करत आहेत.