
संसदच सर्वोच्च, त्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही : उपराष्ट्रपती धनखड.
संसद लोकशाहीत सर्वोच्च आहे. संसदेपेक्षा कोणताही अधिकार श्रेष्ठ नाही. भारतीय संविधान कसे असेल? त्यात कोणत्या सुधारणा करायच्या हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार केवळ खासदारांना आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज .त्यांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयाबाबत केलेल्या विधानावर टीका होत असताना त्यांनी या मुद्यावर पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केले आहे.
ते दिल्ली विद्यापीठामध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.१९७७ मध्ये आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधानांना जबाबदार धरण्यात आले. म्हणून, यात शंका नसावी की, संविधान हे लोकांसाठी आहे. ते त्यांचे रक्षण करण्याचे भांडार आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधींकडेच संविधानातील मजकूर काय असावा, याचे अंतिम अधिकार आहेत. संसदेच्या वर कोणत्याही अधिकाराची संविधानात कल्पना नाही. संसद सर्वोच्च आहे आणि परिस्थिती असल्याने, मी तुम्हाला सांगतो की, ती देशातील प्रत्येक व्यक्तीइतकीच सर्वोच्च आहे.” असेही धनखड यावेळी म्हणाले.