
लांजात क्रांतिकारकांच्या स्मृतिस्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
लांजा : क्रांती दिनानिमित्त आमदार राजन साळवी यांनी लांजा पंचायत समितीच्या आवारात असलेल्या तालुक्यातील क्रांतिकारकांच्या बलिदानाची शौर्यगाथा सांगणाऱ्या स्मृतीस्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या व कारावास भोगलेल्या तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी लांजा पंचायत समितीच्या आवारात क्रांतिकारकांचा स्मृतिस्तंभ उभा आहे. ऑगस्ट क्रांती दिनी याच क्रांतिकारकांच्या स्मृतीला वंदन करण्याचा दिवस. त्यानिमित्ताने शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी यांनी लांजा येथील स्मृती स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक सदाशिव वंजारे यांचे सुपुत्र श्रीराम वंजारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तहसीलदार प्रमोद कदम, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, नगराध्यक्ष मनोहर बाईत, गटशिक्षणाधिकारी विजय बंडगर, नगरपंचायतीचे प्रशासन अधिकारी अविराज पाटील आदींसह पक्षीय पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.