जागतिक नारळ दिनानिमित्त स्पर्धा
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय नारळ समुदायामार्फत जागतिक नारळ दिवस साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने उत्कृष्ट नावीन्यपूर्ण नारळ उत्पादक शेतकरी, उत्कृष्ट नारळ शेतकरी समूह किंवा संस्था, उत्कृष्ट नारळ शास्त्रज्ञ, उत्कृष्ट नारळ लेखक या पाच प्रकारच्या पारितोषिकांसाठी राज्यांतर्गत प्रत्येक प्रकारच्या लाभार्थींकडून नामनिर्देशने मागविण्यात येत आहेत. नामनिर्देशन 10 ऑगस्ट 2022 पूर्वी नारळ विकास बोर्ड कोची यांना पाठविण्यात येणार आहेत. प्रस्तावासोबत वृत्तपत्रात प्रदर्शित बातमी, पारितोषिक फोटो, व्हिडीओ, प्रमाणपत्र इ. बाबी सोबत सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नारळ विकास मंडळ कोची यांच्या वेबसाईटवर अथवा राज्य केंद्र ठाणे येथे दूरध्वनीवर अथवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.