किन्हळ येथून वृद्ध बेपत्ता

दापोली : तालुक्यामधील किन्हळ देऊळवाडी येथून शंकर येसवारे हे 81 वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवार 8 जुलै रोजी घडली. शंकर येसवारे यांचा मुलगा अनंत येसवारे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे वडील गावात फिरून येतो, असे सांगून घरातून निघून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांची परिसरामध्ये शोधाशोध करण्यात आली. परंतु कोठेही आढळून न आल्यामुळे अखेर दापोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गुजर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button