
”दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करु नका नाहीतर…” सुप्रीम कोर्टाने ‘पतंजली’ला फटकारले
योगगुरु रामदेव बाबांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ कंपनीला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. आधुनिक औषधं आणि लशींच्या विरोधात जाहिराती करु नका, नाहीतर दंड आकारला जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने पतंजलीला आधुनिक औषधं आणि वॅक्सिनेशनच्या विरोधात जाहिराती केल्याप्रकरणी सुनावलं आहे. कोर्टाने इशारा दिला असून कुठल्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा खोटे दावे केले तर नक्कीच दंड भरावा लागेल.
इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद कंपनीविरोधात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी झाली. कोर्टाने कंपनीला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्याची ताकीद दिली दिली आहे.
www.konkantoday.com