चिपी विमानतळावर वाघांच्या डरकाळ्या यांचा आवाज आला तर घाबरू नका ,कोल्ह्याना पळवण्यासाठी शोधला आहे नामी उपाय

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच विमानतळ प्रशासनाला मात्र एका नव्या समस्येने ग्रासले आहे विमान उतरण्याची अनेकवेळा विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्हय़ाचे दर्शन होत असल्याने अनेकवेळा विमान उतरवण्यास अडचणी येत आहेत
चिपी विमानतळावरील धावपट्टीवर येणाऱ्या कोल्ह्यांना हाकलवण्यासाठी आता चक्क विमान येण्याच्या पूर्वी ध्वनिक्षेपकावरून वाघाच्या डरकाळीचा आवाज काढला जात आहे.मात्र ही युक्ती किती दिवस यशस्वी ठरेल हे मात्र काही दिवसांनी स्पष्ट होणार आहे.
चिपी विमानतळ सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी धावपट्टीवर कोल्हयाचा वावर वाढला. काहीवेळा तर विमान उतरण्या पूर्वी पायलटला आकाशात घीरटे मारावे लागले होते. त्यानंतरही विमान लँडिंग आणि टेक अप करण्यात पूर्वी या कोल्यांचा मोठा अडथळा विमानतळ प्रशासनाला होऊ लागला. यावर उपाय म्हणून वनविभागाच्या वतीने धावपट्टीच्या खडकाळ भागात कोल्हे पकडण्यासाठी पिंजरे लावले होते मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही.
म्हणूनच आता या कोल्हे यांचा बंदोबस्त करण्यासाठी नवी शक्कल लढवून विमान येण्यापूर्वी विमान धावपट्टी भागात ध्वनिक्षेपकावरून वाघाच्या डरकाळी चा आवाज काढला जात आहे
आता या डरकाळय़ाचा काही उपयोग होत होता लवकरच करणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button