
भाजपाच्या भूमिकेमुळे दापोलीत शिंदेंच्या सेनेची चांगलीच कोंडी.
दापोली विधानसभेचा उमेदवार हा बदलून मिळावा, अशी ठाम भूमिका भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी घेतली आहे. साठे यांच्या याच भूमिकेमुळे दापोलीत शिंदेंच्या सेनेची चांगलीच कोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार सुनील तटकरे हे दापोली मतदारसंघात साडेआठ हजार मतांनी मागे पडले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही हातची निसटले, असे साठे हे सातत्याने माध्यमांशी बोलताना सांगत आहेत. दरम्यान, आमदार योगेश कदम यांना दापोलीत पुन्हा उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील भाजप स्थानिक नेते मंडळी वेगळी चूल मांडतील, असे एकंदरीत चित्र भाजपच्या भूमिकेवरून दिसत आहे.