विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षकांची होणार चारित्र्य तपासणी
रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षक, प्रशासक, कर्मचारी, शिपायांची चारित्र्य पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याबाबत शाळांना आदेश दिले जाणार आहेत, तसेच त्याच्या अंमलबजावणीकडे शालेय शिक्षण विभागाचे लक्ष असणार आहे.
गेल्या काही दिवसांत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थी-शिक्षकांमधील नात्याबाबत सवाल उपस्थित होत आहेत. विद्यार्थी सुरक्षेच्या मुद्द्यावर शाळांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना, शिक्षण विभाग शाळांवर काय कारवाई करतो, असा प्रश्नही पालकांमधून उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने यंदा मोठा निर्णय घेतला आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षक संघटनांमध्ये याबाबत कोणते विचार विनिमय होतात, याकडेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.