
बालिका अत्याचार प्रकरणी नराधमावर कारवाई करावी हिंदू राष्ट्रसेनेची मागणी
रत्नागिरी ः शिवाजी स्टेडियममध्ये झालेल्या आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले असून या प्रकरणी नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मारूती मंदिर येथील स्टेडिययममध्ये आसरा घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी सागर कदम, अमोल देसाई, हिमांशु देसाई, श्रीनाथ सावंत, मंदार देसाई, अतुल कुळ्ये, संध्या कोसुंबकर, रमेश नारके, अभिषेक खरात, अभिषेक भोसले, अभि देसाई, मयुरेश मडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.