कळंबस्ते येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या
चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दि. 28 मे रोजी सकाळी 11.30 वाजता निदर्शनास आली. शैलेश श्रीधर मोरे (वय 32, राहणार कळंबस्ते) असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर राजेंद्र गंगाराम महाडिक (58, खांदाटपाली) यांनी दिली. शैलेश याने खांदाट येथे आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.