एकता मार्ग ते राजापूरकर कॉलनी या जोड रस्त्या डांबरीकरणाकडे गेली पंधरा वर्षे जाणीवपूर्वक दुर्लक्ष,रहिवासी न प निवडणुकीवर बहिष्कार टाकणार
( आनंद पेडणेकर ) संसारे गार्डन जवळील एकता मार्ग ते राजापूरकर कॉलनी या जोड रस्त्या कडे गेली पंधरा वर्ष रत्नागिरी नगर परीषदेने जाणिवपूर्वक कानाडोळा केला आहे . हा रस्ता ८ बंगले आणि एक कौलारू घर याचे प्लॉटीग होताना नगर परिषदेने ताब्यात घेतला त्या नंतर त्यावेळचे इंजिनियर मयेकर असताना निलेश राणे यांनी पाठपुरावा करून गटार बांधले त्या नंतर कितीतरी अर्ज विनंत्या करून ही ह्या रस्याकडे नगर परीषद लक्ष देत नाही या ठीकाणी असलेल्या बंगल्या वरती आणि घरावरती घर पट्टी आणि पाणि पट्टी न चुकता वसूल केली जातेय तरीही या रस्त्याकडे लक्ष दिले जात नाही नगर परीषदेने नागरीकाना मुलभूत सुविधा रस्ता, पाणि, गटारे, लाईट ( सविजनिक दिवा बत्ती ) उपलब्ध करून देण्याचं असून ही त्या पासून त्यानि फारकत घेतलेली दिसते . मागिल दिवाळी नंतर कोकण टुडे ने या रस्यावरील सा फ सफाई न झाल्याची बातमी प्रसिद्ध केल्यावर आरोग्य सभापतीनि या रस्त्याची साफ सफाई केली होती या रस्यावरती जो काही डाबराचा भाग दिसतोय तो निलेश राणे यानि स्वखर्चाने दोन वेळा केला आहे . नगर परिषदेकडे या विषयी माहिती च्या अधिकारात माहिती काही रहिवाशांनी मागवली होती त्यांना ती आजपर्यंत देण्यात आलेली नाही अजून पर्यन्त संयम पाळणारे येथिल रहिवाशी आगामी रनप च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत . संपूर्ण शहरातील बहुतांशी रस्त्याचे डाबरीकरण झाले आहे तरीही हा रस्ता डाबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
www.konkantoday.com