भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक मयेकर यांच्या घरी मंत्री उदय सामंत पोहोचले
रत्नागिरीतील राजकारणावर मंत्री उदय सामंत यांची मोठी पकड आहे अनेकवेळा मंत्री सामंत हे राजकारणविरहित काम करताना दिसतात त्यामुळे अनेक विरोधी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या घरी मंत्री उदय सामंत अचानक पोहोचले संकेत अशोक मयेकर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याबद्दल त्यांनी शुभेच्छाही दिल्या मयेकर यांच्या घरी मंत्री उदय सामंत जवळजवळ एक तास थांबले होते त्यामुळे साहजिकच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली मात्र ही चर्चा अनौपचारिक होती की कशी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही रत्नागिरी नगर परिषदेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांची मयेकर यांच्या घरी दिलेली भेट स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे
www.konkantoday.com