रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ संचालित वैकुंठ रथाचे लोकार्पण
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ संचालित वैकुंठ रथाचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी श्री देव भैरी मंदिरात मोठ्या संख्येने शहरातील व्यापारी व नागरिक उपस्थित होते. अनेक वर्षांपासून रत्नागिरी करांना शव वाहिनीची गरज होती. ही गरज ओळखून रत्नागिरी शहरातील व्यापारी व व्यवसायिकांनी सढळ हस्ते निधी जमवून वैकुंठ रथ तयार केला आहे. श्री देव भैरी मंदिर संस्थेचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे यांनी या वैकुंठ रथाच्या लोकार्पणाची घोषणा केली. यावेळी माजी नगरसेवक निमेश नायर, कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करणारे नगर पालिकेचे कर्मचारी, अंत्यविधीत नागरिकांना मदत करणारे विविध समाजातील स्वयंसेवक यांचा सत्कार करण्यात आला. वैकुंठ रथाची ही सेवा रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध असून या सेवेसाठी स्वेच्छा शुल्क ठेवण्यात आले आहे. रत्नागिरी शहर व्यापारी संचालित या सेवेची उपस्थित नागरिकांनी प्रशंसा केली आहे.
www.konkantoday.com