आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे असे म्हणत, संजय राऊत यांनी चालीसा ऐवजी हनुमान स्त्रोत्र म्हटले
हनुमान चालिसा आणि भोंग्यावरून सुरू असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहतोय. निवडणुकीच्या तोंडावर साऱ्याच राजकीय पक्षांनी एकेका दैवताला निवडणुकीच्या फडात उभा केल्याचा भास होतोय.नाशिकमध्ये आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा रामाचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमचीच असल्याचे ठणकावून सांगितले. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे म्हणत त्यांनी चालीसा ऐवजी हनुमान स्त्रोत्र म्हटले. पत्रकारांनी ही हनुमान चालीसा नाही म्हणताच त्यांची थोडी गडबड झालेली पाहायला दिसली. मात्र, आम्हाला या तरी चार ओळी येतात म्हणून त्यांनी विषय रेटून नेला. शिवाय पुन्हा आक्रमक होत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. एकंदर काय, तर ज्या हनुमानाच्या नावावरुन राजकारण सुरूय त्यांचे स्तोत्र कोणते आणि चालीसा कोणती, हे सुद्धा राजकीय नेत्यांना माहित नसल्याचे समोर येतेय
www.konkantoday.com